India's Forex Reserve and IMF

Today, the world sees India as a new power, not just militarily but with prospect of being an economic superpower, it is moving fast. Nation that adopted the path of economic liberalization by mortgaging its gold in 1991 is now ranked 4th in the world in terms of foreign exchange reserves by 2021. India has foreign exchange reserves of INR 47 lakh crore.

 


India's foreign exchange reserves are currently the talk of the world, reason being a statement issued by International Monetary Fund. IMF have commented on India's rapidly growing foreign exchange. Informing the Reserve Bank of India, the IMF says that the pace at which India is raising foreign exchange should be slowed down by the RBI. Responding to the suggestion, the RBI said that the RBI is working in the same way as any other central bank in the world.

We are seeing a lot of movements over the last few months on the issue of Indian foreign exchange reserves. The US Treasury had put India on the list of 'currency manipulators', and now we see that the IMF has given a consultation on the RBI's intervention policy. India's foreign exchange reserves are the largest in the world after China, Japan and Switzerland. To put it simply, India will be able to run itself comfortably depending on net imports for 16 consecutive months. In fact, in 2020-21, the RBI bought 5.5% of the country's GDP in foreign currency.

According to a report released by the International Monetary Fund (IMF) on India, foreign exchange reserves are not only beneficial, but the RBI's exchange intervention policy should be used only when the market is volatile.

Foreign exchange intervention is the devaluation of one's own currency by an artificial manipulation, which gives the country an unequal advantage in the international market. If an American buys an orange for a dollar after exporting it to America, he spends Rs 75 in Indian rupees. If the value of the Indian rupee increases, this means that if exchange rate falls down from Rs 75 to Rs 50, the same American citizen will have to spend a dollar and a half, which will make him reconsider buying the goods, which could have an impact on India's exports. To avoid this, many countries around the world and their central banks are pursuing a policy similar to that of the RBI itself.



-----------------------------------------------



मराठी भाषांतर -

आज जग भारताकडे एक नवीन ताकद म्हणून पाहत आहे. पण ताकद म्हणजे फक्त सैनिकी ताकद नाही तर एक आर्थिक महासत्ता म्हणून पण भारत वेगाने पुढे जात आहे. १९९१ मध्ये ज्या देशाने आपलं सोनं गहाण ठेवून आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्विकारला होता तो आज २०२१ मध्ये परकीय चलन साठ्याच्या दृष्टीने जगामध्ये ४ थ्या क्रमांकावर आहे. भारताकडे ४७ लाख कोटी भारतीय रुपयांचा परकीय गंगाजळी उपलब्ध आहे.

भारताचा परकीय चलन साठा हा सध्या भरपूर चर्चेत असल्याचं कारण म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड या संस्थेने  केलेली एक टिपणी. इंटरनॅशन मॉनेटरी फंड किंव्हा आयएमएफ ने भारताच्या या वेगाने वाढणाऱ्या परकीय चलनावर भाष्य करून काही टीका सदृश सूचना केली आहे. भारताच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया ला सूचना देताना आयएमएफ म्हणते कि ज्या वेगाने परकीय चलन भारत वाढवत आहे, त्याचा वेग आरबीआय ने कमी करायला हवा. ह्या सूचनेला उत्तर देताना आरबीआय म्हणते कि जगाच्या पाठीवरती कोणतीही सेंट्रल बँक ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने आरबीआय काम करत आहे.

भारतीय परकीय चलन साठ्याच्या दृष्टीने काही महिन्यांपासून बऱ्याच हालचाली आपण बघत आलो आहोत. यूएस ट्रेजरी ने भारताला 'करन्सी मॅनिप्युलेटर' च्या यादीत टाकणे आणि आता आयएमएफ ने आरबीआय च्या इंटरव्हेंशन पॉलिसी वर एक परामर्श दिलेला आपल्याला दिसत आहे. भारताचा परकीय चलन साठा स्वित्झर्लंड, जपान आणि चीन नंतर सगळ्यात मोठा आहे. परकीय चलनाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असा म्हणता येईल कि भारत हा १६ सलग महिने निव्वळ आयातीवर अवलंबुन आरामात राहू शकतो. एक वस्तुस्तिथी सांगायची झाली तर २०२०-२१ या काळात आरबीआय ने देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ५.५% परकीय चलन विकत घेतलं.

आयएमएफ ने भारतावर जारी केलेल्या अहवालानुसार, परकीय चलन जमा करणे एवढे फायद्याचे नसून, आरबीआय राबवत असलेल्या एक्सचेंज इंटरव्हेंशन पॉलिसीला फक्त जेंव्हा बाजार अनियमित असेल तेंव्हाच वापर करावा असे नमूद करण्यात आलेलं आहे.

फॉरेन एक्सचेंज इंटरव्हेंशन म्हणजेच परकीय चलन हस्तक्षेप हि एक कृत्रिम फेरफार करून स्वतःच्या चलनाचे मूल्य कमी करणे, ज्याने एक असमान फायदा त्या देशाला आतंरराष्ट्रीय बाजारात होतो. सोप्या भाषेत सांगायचं झाला, एक भारतीय संत्री निर्यात केल्यांनतर १ डॉलरला अमेरिकन नागरिकाला विकत घेत असेल तर तो भारतीय रुपया प्रमाणे ७५ रुपये खर्च करतो. जर भारतीय रुपयाचे मूल वाढले, म्हणजेच जे ७५ चे ५० रुपये झाले तर त्याच अमेरिकेन नागरिकाला दीड डॉलर खर्चा करावा लागेल, ज्याने तो नागरिक ते सामान खरेदी करताना पुन्हा विचार करतो, जो भारताच्या निर्यातीवर परिणामकारक ठरू शकतो. हे टाळण्यासाठी जगातले अनेक देश आणि त्यांचा सेंट्रल बॅंक्स या पद्धतीने धोरण आखतात जे स्वतः भारताची आरबीआय पण राबवते.

Comments

Popular posts from this blog

Sovereign Gold Bonds | 2023-2024